इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईत ग्राफिक डिझायनर जॉबसाठी टाकलेल्या एका पोस्टवरुन सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या पोस्टमध्ये मराठी उमेदवारांनी अर्ज भरु नये असे म्हटले होते. त्यानंतर या पोस्टवरुन सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. मुंबईत राहून मराठी माणसाचा द्वेष करणा-या या पोस्टनंतर माफी मागीतली असली तरी हा विषय गंभीर असल्याचे बोलले जात आहे.
ही पोस्ट टाकणा-या एचआर मॅनेजरने मी खरोखर माफी मागतो, काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक डिझायनर जॉब ओपनिंग पोस्ट पोस्ट केली होती आणि एका आक्षेपार्ह वाक्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. तुम्हाला कळवायचे आहे की मी अशा टिप्पण्यांना समर्थन देत नाही ज्यामध्ये कोणाशीही भेदभाव होईल. हे माझ्या दुर्लक्षामुळे झाले, मी येथे हे जॉब ओपनिंग पोस्ट केले आहे.
महाराष्ट्रात राहून मराठी उमेदवारांनी अर्ज करु नये अशी पोस्ट टाकण्याचे धाडसच कसे होते असा प्रश्न आता विचारला जात आहे. या कंपनीने माफी मागितली असली तरी या पोस्टवर कारवाई व्हावी अशी मागणी आता होत आहे.