इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोठा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून केला आहे. यात त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट यांच्या मार्फत हा कट रचल्याचे म्हटले आहे. या कटाचा गौप्यस्फोट करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहे. या पोस्टमुळे राजकारणात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.
मोहित कंबोज यांनी ट्विट मध्ये कोणाची नावे घेतली नसली तरी त्यांनी त्या राष्ट्रवादी काँग्रेसची महिला नेता, आयपीएस अधिकारी, एक आमदार, या षडयंत्रात सामील आहेत. त्यात एका माजी पत्रकारांचाही समावेश असल्याचा दावा त्यांनी केला. लवकरच या कटाचा खुलासा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मोहित कंबोज यांची पोस्ट अशी आहे, #SPNCP आणि #UBTSena द्वारे देवेंद्रजींच्या विरोधात रचलेल्या कटाचा मी लवकरच पर्दाफाश करीन. एका गुन्हेगार माजी पत्रकाराला सशुल्क हिट नोकरी. मास्टर माइंड एक #SPNCP महिला राजकारणी आणि #IPS आणि 1 #MLA ने आर्थिक मदत केली. ते कसे बनावट सामग्री तयार करत आहेत ते उघड करेल. संपर्कात रहा आणि मोठ्या प्रदर्शनासाठी तयार रहा.