इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
१९२५ मध्ये अॅंग्लो इंडियन समुदायासाठी म्हणुन स्थापन करण्यात आलेल्या बार्न्स स्कुलच्या ९९ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा प्राचार्या उत्तरा कुलकर्णी यांची नियुक्ती झाली आहे. प्राचार्या उत्तरा कुलकर्णी यांची नियुक्ती म्हणजे शाळेची पूर्वपरंपरागत चालत आलेली प्रथा तोडणारी म्हणून या कडे बघितले जात आहे.
उपप्राचार्या या पदावर उत्कृष्टपणे काम केल्याची ही एक त्यांच्या कार्यसन्मानाची पावतीच त्यांना मिळाली आहे. प्रतिष्ठित बार्न्स स्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या इतिहास पहिल्या महिला प्राचार्या म्हणून पदभार स्विकारला आहे. शाळेसाठी हा क्षण खरोखरच अभिमानाचा असल्याचे यावेळी येथील शिक्षकांनी सांगितले.
शिस्तप्रिय आणि अतिशय हुशार व्यक्तिमत्व असणाऱ्या उत्तरा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शाळा नक्कीच अधिक उंची गाठेल यात शंकाच असेही यावेळी सांगण्यात आले. अनेक सेलिब्रेटींनी या स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. त्यामुळे या शाळेची एक वेगळी ओळख आहे.