इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात पाचेरी आगर येथे गणेश विसर्जन मिरवणूकीत टेम्पो शिरल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू तर पंधरा जण जखमी झाले आहे. ब्रेक फेल झाल्याने ही घटना घडली. यामधील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. दिपक भुवड आणि कोमल भुवड अशी मृत झालेल्या दोघाची नावे आहेत.
विसर्जनाची मिरवणूक निघाल्यानंतर मिरवणूकीमध्ये हा टेम्पो शिरला. या टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. पोलीसांनी चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु केली आहे. या घटनेमुळे मिरवणुकीला गालबोट लागले आहे.
मुंबईत जुहू चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी प्रशासनाच्या मदतीसाठी असलेल्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला. तर नाशिक जिल्ह्यात चार जण पाण्यात बुडाले यात दोन जणांचा मृत्यू झाला तर दोन जणांचा शोध घेतला जात आहे. त्यानंतर गुहागरमधील ही धक्कादायक घटना घडली आहे.