छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ज्येष्ठस्वातंत्र्य सेनानी श्रीमती विमल देशपांडे या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येत असतांना त्यांना तेथेच बसू द्या; मीच येऊन भेटतो असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः त्यांच्यापर्यंत गर्दितून वाट काढत पोहोचले व त्यांची आस्थेने विचारपुस केली. त्यांच्या या भेटीमुळे सर्वांनीच
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या ज्येष्ठांप्रती असलेल्या आदरभावाचे दर्शन उपस्थितांना झाले. मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे सोहळ्यास उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांना भेटण्यासाठी गेले.
तेथे भेटत असतांना समोरुन ९० हून अधिक वर्षे वय असणाऱ्या श्रीमती विमल देशपांडे या त्यांना भेटण्यासाठी येत असतांना मुख्यमंत्र्यांना दिसल्या. त्यांना वयोमानामुळे गर्दीतून वाट काढणे शक्य होत नव्हते. त्यांची अवस्था पाहून मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की, त्यांना तेथेच बसू द्या, मीच तेथे येतो. असे म्हणत मुख्यमंत्री श्रीमती देशपांडे यांच्या पर्यंत पोहोचले आणि त्यांची विचारपूस केली.