मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काल शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३९७ उमेदवारांचे ५१२ अर्ज दाखल झाले होते. आज या अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण ३०१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघात २२, दिंडोरी – १५, नाशिक – ३६, पालघर – १३, भिवंडी – ३६, कल्याण – ३०, ठाणे – २५, मुंबई उत्तर – २१, मुंबई उत्तर पश्चिम – २३, मुंबई उत्तर पूर्व – २०,मुंबई उत्तर मध्य – २८, मुंबई दक्षिण मध्य – १५, आणि मुंबई दक्षिण – १७ असे एकूण ३०१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख सोमवार दिनांक ६ मे २०२४ आहे.