नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात शुक्रवारीवेगवेगळया भागात राहणा-या महिलेसह एकाने आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत देवळाली कॅम्प व मुंबई नाका पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना विनयनगर येथे घडली. विनोद भिकाजी शहारे (५२ रा.श्री गणेश बंगलो विनयनगर पाथर्डीरोड) यांनी शुक्रवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार म्हैसधुणे करीत आहेत.
दुस-या घटनेत देवळाली कॅम्प येथील अनिता सुनिल गांगुर्डे (४५ रा.ओमशांती नगर,दस्तगीरबाबारोड) यांनी शुक्रवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच दिर अनिल गांगुर्डे यांनी त्यांना तातडीने कॅन्टोमेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वी डॉ. रूपाली राठोड यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार पानसरे करीत आहेत.