नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आडगाव शिवारातील वेगवेगळया भागात झालेल्या दोन चो-यांमध्ये चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाखाचा ऐवजावर डल्ला मारला. बंगल्याच्या खिडकीतून हात घातल पर्स चोरून तसेच उघड्या घरात शिरून चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांवर डल्ला मारला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर भगीरथ रायते (रा.आकाश बंगला,गंगोत्री विहार) व दर्शन दिलीप शिंदे (रा.श्री रो हाऊस महालक्ष्मीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. रायते यांच्या बंगल्यातील बेडरूमच्या उघड्या खिडकीत हात घालून चोरट्यानी रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ९८ हजाराचा ऐवज असलेली पर्स चोरून नेली. ही घटना गुरूवारी (दि.२) रात्री घडली. तर शिंदे कुटूंबिय शुक्रवारी (दि.३) पहाटे झोपेत असतांना अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून टेबलावर ठेवलेले सुमारे ८० हजार रूपये किमतीचे तीन लॅपटॉप चोरून नेले. दोन्ही गुह्यांबाबत पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार राजुळे व देसाई करीत आहेत.