नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या निवडणुका रंगात आलेल्या असतांना नाशिकच्या घोटाळ्याबाबत मोठा व गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय खळबळ निर्माण झाली आहे.
त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले आहे की, मोदी यांच्या काळात भ्रष्ट्राचार हाच शिष्टाचार ठरत आहे. सध्याचे महाराष्ट्रातील मिंधे सरकार हेत्याचे ज्वलंत उदाहरण! नाशिक महानगर पालिका हद्दीत ८०० कोटीचा भुसंपादन घोटाळा नगरविकास खात्याने केला असून मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे लोक या गैरव्यवहारातले थेट लाभार्थी आहेत. मी दोन दिवसांत यावर स्फोट करीन, तो पर्यंत लाभार्थीनी शांत झोपावे. महाराष्ट्र कोण लुटत आहे? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
राऊत यांनी केलेल्या या आरोपामुळे आता नाशिकचे राजकारण चांगलेच ढवळून निघणार आहे. नाशिक महानगरपालिका याअगोदरही वेगवेगळ्या घोटाळ्यात चर्चेत होती. पण, आता या घोटाळ्यामुळे महानगरपालिकेच्या कारभाराचे वाभाडे निघणार आहे.