नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत २० व्यक्तींचे २९ अर्ज प्राप्त झाले होते. १५ उमेदवारांचे अर्ज वैध व पाच उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी छाननी प्रक्रिये वेळी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवन येथे आज सकाळी ११ वाजता 20 दिंडोरी मतदार संघात प्राप्त नामनिर्देशन अर्जांची छाननी करतेवेळी पारधे बोलत होते. यावेळी भारत निवडणुक आयोगाने नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) बिनिता पेगु, उपविभागीय अधिकारी दिंडोरी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्यासह नामनिर्देशन पत्र सादर केलेले उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, तसेच संबंधित अर्जदाराने प्राधिकृत केलेले प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्राप्त नामनिर्देशन पत्रांसोबत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी ११ वाजता निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत वैध व अवैध ठरलेल्या उमेदवारांची माहिती जाहिर केली. तसेच अर्ज माघार प्रक्रिया ६ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात होणार असून त्यांनतर चिन्ह वाटप करण्यात येणार असल्याचेही दिंडोरी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पारधे यांनी सांगितले.
या निवडणुकीत वैध झालेल्या उमेदवारांची यादी