नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत नाशिक लोकसभा मतदार संघात नामनिर्देशनपत्र छाननीत ३६ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी दिली.
राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार
1)अरूण मधुकर काळे (बहुजन समाज पक्ष) 2) पराग प्रकाश वाजे (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)) 3) हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार
4.अमोल संपतराव कांबळे (राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी) 5) आव्हाड झुंजार म्हसुनी (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी) 6) कमलाकर बाळासाहेब गायकवाड (दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल) 7) करण पंढरीनाथ गायकर (वंचित बहुजन आघाडी) 8) कांतीलाल किसन जाधव (आंबेडकराइट पार्टी ऑफ इंडिया) 9) कैलास मारूती चव्हाण (आम जनता पार्टी (इंडिया) 10) कोळप्पा हनुमंत धोत्रे (भारतीय लोकशक्ती पक्ष) 11) जयश्री महेंद्र पाटील (सैनिक समाज पार्टी) 12) तिलोत्तमा सुनिल जगताप (बहुजन मुक्ती पार्टी) 13) दर्शना अमोल मेढे (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) 14) भाग्यश्री नितीन अडसुळ (इंडियन पिपल्स अधिकार पार्टी) 15) यशवंत वाळु पारधी (भारतीय अस्मिता पार्टी) 16) वामन महादेव सांगळे (धर्म राज्य पक्ष)
इतर उमेदवार
17) अनिल दयाराम जाधव (अपक्ष) 18) अरिंगळे निवृत्ती विठोबा (अपक्ष) 19) आरिफ उस्मान मन्सुरी (अपक्ष) 20) करंजकर विजय किसन (अपक्ष) 21) किसन शंकर शिंदे (अपक्ष) 22) गणेश बाळासाहेब बोरस्ते (अपक्ष) 23) चंद्रकांत केशवराव ठाकुर (अपक्ष) 24) चंद्रभान आबाजी पुरकर (अपक्ष) 25) जितेंद्र नरेश भाभे (अपक्ष) 26) दिपक विष्णु गायकवाड (अपक्ष) 27) देविदास पिराजी सरकटे (अपक्ष) 28) धनाजी अशोक टोपले (अपक्ष) 29) प्रकाश गिरधारी कनोजे (अपक्ष) 30) शशिकांत सुकदेव उन्हवणे (अपक्ष) 31) शांतीगिरीजी मौनगिरीजी महाराज (अपक्ष) 32) सचिनराजे दत्तात्रेय देवरे (अपक्ष) 33) सिद्धेश्वरानंद गुरूस्वामी सोमेश्वरानंद सरस्वती (अपक्ष) 34) सुधीर श्रीधर देशमुख (अपक्ष) 35) सुषमा अभिजीत गोराणे (अपक्ष) 36) सोपान निवृत्ती सोमवंशी (अपक्ष)
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात नाशिक मतदार संघात प्राप्त नामनिर्देशन अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात प्राप्त नामनिर्देशन पत्रांसोबत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी ११ वाजता निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत वैध ठरलेल्या उमेदवारांची माहिती जाहिर केली. तसेच अर्ज माघार प्रक्रिया ६ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत होणार त्यांनतर चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.
वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी