इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुणे येथे सभा झाली. त्यावेळी त्यांनी इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास देशातील आरक्षणाची मर्यादा ५० टक्के काढून टाकू अशी घोषणा केली. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील यांनी त्यांच्या या घोषणेचे स्वागत केले.
पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत सांगितले की, मा. राहुल गांधी मराठा आरक्षणावर बोलले! त्यांनी सांगितलं की, आमचं सरकार देशात आल्यास जातीय जनगणना करू व 50% आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा कायदा संसदेत करू. राहुलजी गांधी यांच्या भूमिकेचं स्वागत करतो.