इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अंमलबजावणी संचालनालय (ED), मुंबई विभागीय कार्यालयाने फसवणूक केलेल्या पॉन्झी/मल्टी लेव्हल मार्केटिंग योजनांबाबत सुरू असलेल्या तपासात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत कोल्हापूर, पुणे आणि नाशिक येथे विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली.
VIPS ग्रुप ऑफ कंपनीज, मेसर्स ग्लोबल एफिलिएट बिझनेस, मेसर्स काना कॅपिटल, रिअल गोल्ड कॅपिटल, फिनिक्स एफएक्स हे अवैध फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्म दुबईमधून विनोद तुकाराम खुटे, त्यांचे कुटुंबीय आणि सहकारी यांच्याद्वारे चालवले जात आहेत.
शोध मोहिमेदरम्यान, रोख रक्कम, बँक निधी, मुदत ठेवी (एफडी), ५ कोटी रुपयांचे दागिने आणि विविध गुन्हेगारी कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे गोठवून जप्त करण्यात आली आहेत.