इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे, मोदी साहेबांनी केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे गेली पाच महिने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊन अक्षरशः मातीमोल भावात कांदा विकला गेला. आता निवडणुकीत शेतकऱ्यांच्या रोषाचा फटका बसू नये म्हणून कुठेतरी मलमपट्टी करण्याचा मोदी साहेब प्रयत्न करत आहेत.
आज सकाळी कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला तर त्यात देखील ५५० $ / टन किमान निर्यात मूल्य (MEP) ची अट टाकून निर्यात होऊ नये याचीच काळजी मोदी साहेबांनी घेतली आहे. MEP ची अट का टाकली? यावर मोदी साहेब आणि अमित शहा साहेब बोलणार नाहीत, त्यामुळे शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा आणि भारती पवार मॅडम यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे.
असो! नव्या सर्कुलरमध्ये कालपर्यंत निर्यातबंदी लागू असल्याचे स्पष्ट आहे. याचाच अर्थ गेल्या आठवड्यात निर्यात बंदी उठवल्याच्या चुकीच्या बातम्या पेरून देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केंद्र सरकारचा उदो उदो करून घेत शेतकऱ्यांची फसवणूक केली, हे मात्र पुन्हा एकदा स्पष्ट झालं.