सोमवार, सप्टेंबर 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आता एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य…

by Gautam Sancheti
मे 4, 2024 | 11:16 am
in स्थानिक बातम्या
0
snbt


एन्डोस्कोपी, गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपीसह ईआरसीपी चाचण्यांना सुरुवात
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-गेल्या काही दिवसांपूर्वी पोट व यकृत (लिव्हर) संबंधित आजार असलेल्या रुग्णांना इतरत्र जाऊन उपचार घ्यावे लागत होते. रुग्णसंख्येचा वाढता आलेख यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नुकताच एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ पोटविकार विभाग सुरु करण्यात आला आहे. याठिकाणी एन्डोस्कोपी, कोलोनोस्कोपी व ईआरसीपी प्रक्रियांना सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोटविकार विभागाची बाह्यरुग्ण सेवा आठवड्यातून दोन दिवस नाशिक येथील क्लिनिकमध्येही सुरु करण्यात आली असून याठिकाणी रुग्णांना उपचार घेता येणार आहेत. याबाबतची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

इगतपुरी तालुक्यातील धामणगाव-घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये नाशिकसह जळगाव, भुसावळ, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बुलढाणा, जालना, भंडारा गोंदियासोबतच ठाणे, पालघर व मुंबईच्या विविध भागांतून रुग्ण उपचारासाठी येत असतात. याठिकाणी पूर्णवेळ पोटविकार तज्ञ याठिकाणी उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. मात्र, गेल्या महिन्यापासून तज्ञ व अनुभवी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रणव आंबर्डेकर पूर्णवेळ याठिकाणी उपलब्ध झालेले असून पोटावरील वेगवेगळ्या स्कोपीसह क्लिष्ट शस्रक्रिया याठिकाणी ते करू लागले आहेत.

सद्यस्थितीत एसएमबीटीमध्ये अद्ययावत गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपीसह ईआरसीपीद्वारे विना शस्त्रक्रिया पोटासंबंधित आजारांचे निदान व उपचार करणे सहज शक्य झाले आहे. यासोबतच अत्याधुनिक फायब्रोस्कॅन ज्याद्वारे लिव्हरची इजा ओळखता येते ही सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांवर याठिकाणी शासकीय योजनेच्या माध्यमातून मोफत तर योजनेत न बसणाऱ्या रुग्णांवर याठिकाणी अल्पदरांत उपचार केले जात आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरीटेबल हॉस्पिटल असलेल्या या हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीत २५ पेक्षा अधिक स्पेशालिटी आणि सुपरस्पेशालिटी विभाग सुरु झाले आहेत. एसएमबीटी हॉस्पिटलला नुकतेच सर्वोच्च रुग्णसेवेचा मापदंड समजल्या जाणाऱ्या एनएबीएच संस्थेची प्राथमिक मान्यतादेखील मिळाली आहे.

रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची (लिव्हर ट्रान्सप्लांट) माहिती मिळावी यासाठी डॉ. आंबर्डेकर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दररोज व नाशिक येथील बाह्यरुग्ण विभागात अवयव प्रत्यारोपणावर विशेष मार्गदर्शन करत आहेत. यासोबतच पचनसंस्थेशी निगडित सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे रुग्णांची गैरसोय यामुळे टळलेली आहेत.

नाशिक क्लिनिकमध्ये बाह्यरुग्ण सेवा
नाशिकमध्ये दर बुधवार आणि शुक्रवारी पोटविकार विभागाची बाह्यरुग्ण सेवा सुरु करण्यात आली आहे. यादरम्यान, पोटासंबंधित आजारांवर सल्ला व मार्गदर्शन केले जाते. यासोबतच अतिशय कमीत दरांत रुग्णांना औषधेदेखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

पोटविकाराची लक्षणे
पोटामध्ये वेदना होणे, गिळायला त्रास होणे, गिळता न येणे, अचानक वजन कमी होणे, भूक कमी लागणे, छातीमध्ये व पोटामध्ये जळजळ होणे, वारंवार अतिसार (डायरिया) होणे, बद्धकोष्ठता, उलट्या व रक्ताच्या उलट्या होणे, काळी संडास, संडासातून रक्त येणे, कावीळ, पित्ताशयातील खडे व पित्तनलीकेतील खडे, यकृताचे विकार, स्वादूपिंडाचे विकार, पोटातील आतड्याला सूज येणे इत्यादी.

आजार अंगावर काढू नका
एसएमबीटी हॉस्पिटलच्या पोटविकार विभागात यकृत रुग्णांमध्ये गळ्याखाली फुगलेल्या नसांवर बॅडिंग करणे, अन्ननलिकेत किंवा पोटामध्ये गिळलेल्या पिन, चुंबक, बॅटरी, काटे व तत्सम गोष्टी पोटातून काढणे, अन्ननलिकेचा अडथळा दूर करणे, अन्ननलिका, पोट, यकृत, स्वादुपिंड, मोठे आतडे यांचा कर्करोग-निदान व उपचार करणे, अन्ननलिका व पोट व आतडे यातून होणारा रक्तस्राव रोखणे, निदान व उपचार, पित्तनलिका व स्वादुपिंडातील खडे व अडथळे ईआरसीपीद्वारे दूर करणे इत्यादी उपचार केले जात आहेत. आजार अंगावर न काढता तत्काळ उपचार घेतल्यास कुठलाही आजार बरा होतो.
डॉ. प्रणव आंबर्डेकर, पोटविकार तज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक व दिंडोरी मतदार संघाच्या उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्राची आज छाननी…

Next Post

नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर स्कुटीला बसची जोरदार धडक…दोन जण जखमी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना नव्या संधीचे दालन खुले होईल, जाणून घ्या, सोमवार, २२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 21, 2025
IMG 20250921 WA0434 1
स्थानिक बातम्या

संयुक्त राष्ट्र महासभेच्या UNGA80 विज्ञान शिखर परिषदेत एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयाने केले देशाचे प्रतिनिधित्व

सप्टेंबर 21, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला फसवणुकीच्या प्रकरणात सुनावली ४ वर्षांची शिक्षा…

सप्टेंबर 21, 2025
bullete train
महत्त्वाच्या बातम्या

बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा केव्हा पूर्ण होणार? रेल्वेमंत्र्यांनी दिली ही माहिती

सप्टेंबर 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८९ कोटी रुपयांचा निधी…

सप्टेंबर 21, 2025
Government of India logo
महत्त्वाच्या बातम्या

भारतीय शिष्टमंडळ या तारखेला अमेरिकेला भेट देणार…या विषयांवर चर्चा

सप्टेंबर 21, 2025
G1Sin8kW4AAjERO e1758416853507
मुख्य बातमी

दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर…असा आहे प्रवास

सप्टेंबर 21, 2025
Screenshot 20250920 151721 WhatsApp 1
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना झालेल्या मारहाणीची मंत्रालयातून गंभीर दखल, गुन्हा दाखल, तिघांना अटक

सप्टेंबर 21, 2025
Next Post
IMG 20240504 WA0200 1 e1714803988607

नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर स्कुटीला बसची जोरदार धडक…दोन जण जखमी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011