इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक व दिंडोरी मतदार संघाच्या नामनिर्देशन पत्राची मुदत ३ मे पर्यंत होती. त्यानंतर आज या नामनिर्देशनपत्राची छाननी होणार आहे. यात कोणाचे उमेदवारी अर्ज वैध व अवैध ठरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातून ३९ उमेदवार रिंगणात आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदार संघातून २९ उमेदवार रिंगणात आहे.
आज छाननी ११ वाजेपासून सुरु होईल. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर ६ मे रोजी माघारीची तारीख असणार असू न त्यासाठी ११ ते ३ पर्यंत मुदत असणार आहे. त्यानंतर किती जण रिंगणात राहतात हे महत्त्वाचे आहे.
या दोन्ही मतदार संघात अधिकृत उमेदवारांविरुध्द बंडखोरी करण्यात आली आहे. आता हे बंडखोर आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवतात का माघार घेतात हे ६ मे रोजी कळणार आहे.