इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
‘ट्राय’ अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने दूरसंचार मोबाइल क्रमांक पोर्टेबिलिटी (नववी सुधारणा) नियमन, २०२३ मसुदा जारी केला. या सुदा नियमनांवर संबंधितांकडून लेखी टिप्पण्या प्राप्त करण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोंबर ही निश्चित करण्यात आली होती.
मात्र टिप्पण्या सादर करण्यासाठी मुदत वाढवण्याची उद्योग संघटनेची विनंती लक्षात घेऊन, लेखी टिप्पण्या सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक ८ नोव्हेंबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
टिप्पण्या, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे सल्लागार (नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि परवाना) अखिलेश कुमार त्रिवेदी यांच्याकडे शक्यतो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात [email protected]. वर पाठवाव्यात. कोणतेही स्पष्टीकरण/माहिती, यासाठी अखिलेश कुमार त्रिवेदी, सल्लागार (नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि परवाना), ट्राय यांच्याशी दूरध्वनी क्रमांक +91-11-23210481 वर संपर्क साधता येऊ शकेल.