इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधात खंडणी, मारहाण व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची रंगत वाढलेली असतांना मनसेला हा मोठा धक्का आहे.
जाधव यांच्यासह दोघांवर सराफाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. जाधव यांचे मित्र वैभव ठक्कर यांना हिशोबासाठी सराफाने बोलावले असताना जाधव यांनी तिथे सराफाच्या मुलाला मारहाण केली. जाधव यांनी उचलून नेण्याची व नुकसान करण्याची धमकी देऊन दिली. जैन यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकावले.
सराफ शैलेश जैन यांच्या तक्रारीनंतर वैभव ठक्कर व अविनाश जाधव यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी जाधव यांनी तक्रार केली आहे. एका व्यक्तीने दूरध्वनी करून मला आणि माझ्या पत्नीला डांबून ठेवल्याची तक्रार केल्यानंतर मी मदतीसाठी पोलिसांसह तेथे गेलो होतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूड भावनेने आपल्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला.
जैन यांनी वैभव ठक्करला झवेरी बाजार येथील जे. के. ज्वेलर्स या कार्यालयात हिशोबासाठी बोलावले होते. या वेळी जाधव यांनी त्यांचे सहकारी, अंगरक्षक आणि सहा ते सात जणांसह तिथे आले. पोलिसांसमक्ष जैन यांचा मुलगा स्वामिल याला मारहाण केली. शैलेश जैन यांना उचलून नेण्याची आणि नुकसान करण्याची धमकी दिली. त्यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकावले, असे फिर्यादीत म्हटले आहे.