इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सीबीआयने मुंबईतील एका आयकर अधिकाऱ्याला ४ लाखाची लाच घेताना अटक केली. आरोपी प्राप्तिकर अधिकारी, वॉर्ड-(2) (1) (1), एअर इंडिया बिल्डिंग, नरिमन पॉइंट, मुंबई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदाराच्या मामाच्या मालमत्तेच्या विक्रीच्या संदर्भात कमी TDS प्रमाणपत्र जारी केल्याबद्दल ही लाच मागीतली. त्यानंतर आरोपींनी ४ लाखाची लाच मागून ती स्वीकारली. सीबीआयने सापळा रचून आरोपीला रंगेहात पकडले. तक्रारदाराकडून त्यांच्या मुंबई येथील कार्यालयात ४ लाख रुपये हस्तगत करुन सीबीआयने अटक केली.
मुंबईतील आरोपींच्या कार्यालयात आणि निवासी परिसरात झडती घेण्यात आली असून त्यामध्ये ५० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. १५ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने, स्थावर आणि जंगम मालमत्तेतील गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे आणि त्यांची छाननी सुरू आहे.