नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- खुटवडनगर भागात पूर्ववैमनस्यातून डीजे ऑपरेटर असलेल्या तरूणावर एकाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज त्रिपुरारी सिंग (रा. मटाले चाळ, विठ्ठल नगर कामटवाडे) असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे. याप्रकरणी भुषण राजेंद्र गोसावी (२७ रा.महालेनगर,खुटवडनगर) या युवकाने फिर्याद दाखल केली आहे. गोसावी डीजे वाजंत्रीवर ऑपरेटरचे काम करतो. संशयित सिंग व त्याच्यात पूर्ववैमनस्य आहे. गुरूवारी (दि.२) गोसावी खुटवड नगर येथील साईबाबा मंदिर परिसरात गेला असता ही घटना घडली. संशयिताने त्यास गाठून जुन्या वादाची कुरापत काढून शिवीगाळ व दमदाटी केली.
यावेळी संतप्त सिंग याने कमरेला लावलेले धारदार शस्त्र काढून गोसावीवर सपासप वार केले या घटनेत गोसावी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक घुनावंत करीत आहेत.
……