इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभेतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात इंडिया- महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली. या सभेला मोठी गर्दी होती. यावेळी उपक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी ‘आता महाराष्ट्रहितासाठी मशाली पेटवा’ असा एल्गार केला.
या सभेला शिवसेना नेते, आमदार अनिल परब, आमदार वैभव नाईक, तेजस ठाकरे तसेच इंडिया-महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. याच बालेकिल्ल्यात गद्दारी झाली असली, तरी निष्ठावंत शिवसैनिक अजूनही ठाकरेंसोबत आहे; ह्याची प्रचिती देणारी आजची जाहीर प्रचार सभा असल्याचे ठाकरे गटातर्फे सांगण्यात आले.
यावेळी उध्दव ठाकरे यांनी भाजप, नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली.