नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : लोकसभा निवडणूकची नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अधिसूचना २६ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर अंतिम दिनांक अखेर म्हणजेच ३ मे पर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघात ३९ उमेदवारांकडून ५६ नामनिर्देशनपत्रे सादर करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी दिली.
यात शांतीगिरीजी मौनगिरीजी महाराज यांनी 4 नामनिर्देशनपत्रे, पराग प्रकाश वाजे यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, जयश्री महेंद्र पाटील यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, देविदास पिराजी सरकटे यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, कमलाकर बाळासाहेब गायकवाड यांनी 1 नामनिर्देशनपत्र, सिद्धेश्वरानंद गुरू स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, जितेंद्र नरेश भाभे यांनी 3 नामनिर्देशनपत्रे, कैलास मारूती चव्हाण यांनी 1 नामनिर्देशनपत्र, कांतिलाल किसन जाधव यांनी 1 नामनिर्देशनपत्र, अरिंगळे निवृत्ती विठोबा यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, दर्शना अमोल मेढे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, करण पंढरीनाथ गायकर यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, आव्हाड झुंजार म्हसुनी यांनी 1 नामनिर्देशनपत्र, प्रकाश गिरधारी कनोजे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, हेमंत तुकाराम गोडसे यांनी 4 नामनिर्देशनपत्रे, भक्ती अजिंक्य गोडसे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, धनाजी अशोक टोपले यांनी 1 नामनिर्देशनपत्र, सुधीर श्रीधर देशमुख यांनी 1 नामनिर्देशनपत्र, चंद्रकांत केशवराव ठाकूर यांनी 1 नामनिर्देशनपत्र, करंजकर विजय किसन यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, वामन महादेव सांगळे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, आरिफ उस्मान मन्सुरी यांनी 1 नामनिर्देशनपत्र, दीपक विष्णू गायकवाड यांनी 1 नामनिर्देशनपत्र, अरूण मधुकर काळे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, अमोल संपतराव कांबळे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, तिलोत्तमा सुनिल जगताप यांनी 1 नामनिर्देशनपत्र, यशवंत वाळु पारधी यांनी 1 नामनिर्देशनपत्र, भाग्यश्री नितिन अडसूळ यांनी 1 नामनिर्देशनपत्र, शशिकांत सुकदेव उन्हवणे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, चंद्रभान आबाजी पुरकर यांनी 1 नामनिर्देशनपत्र, अनिल दयाराम जाधव यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, गणेश बाळासाहेब बोरस्ते यांनी 1 नामनिर्देशनपत्र, सोपान निवृत्ती सोमवंशी यांनी 1 नामनिर्देशनपत्र, किसन शंकर शिंदे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, जयदेव भिवसन मोरे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, भिमराव जयराम पांडवे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, सुषमा अभिजित गोराणे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, कोळप्पा हनुमंत धोत्रे यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, सचिनराजे दत्तात्रय देवरे यांनी 1 नामनिर्देशनपत्र सादर केले आहे.