इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – आमदार अपात्रताप्रकरणी आज ३४ वेगवेगळ्या याचिका यापुढे ६ याचिकेत मांडल्या जाणार असून त्याची वर्गवारी केल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. आता पुढची सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार आहे.
बच्चू कडू यांची बाजू मांडणारे ॲड. प्रवीण टेंबेकर यांनी या याचिकांच्या वर्गवारी बद्दल माहिती देतांना सांगितले की, याप्रमाणे ढोबळ सहा याचिका करण्यात आल्या आहे. १) पहिल्या मिटींग हजर राहिले नाही २) दुसऱ्या मिटींगला उपस्थितीत नव्हते ३) स्पीकर विरोधात मतदान करणे ४) बहुमत चाचणी मतदान व्हीप विरोधात ५) भरत गोगावले व्हीप बजावले मोडला याचिका ६) अपक्ष आमदार गट याचिका
ठाकरे गटाचे वकील सनी जैन यांनी दिलेली माहिती अशी की, आज सुनावणीमध्ये ६ याचिकामध्ये क्लब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ ते १६ ठाकरे गट याचिका, गृप A, याचिका नंबर १७ ठाकरे गटाकडून अपक्ष आमदार विरोधात दाखल केल्या आहेत. या सुनावणीवर अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. ठाकरे गट प्रत्येक सुनावणीत नवा अर्ज देत आहे. त्यामुळे ही सुनावणी लांबत आहे, असे अर्जावर अर्ज येत आहेत. तर सुनावणी लांब जाईल.