नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा निवडणूक 2024 ची नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अधिसूचना 26 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर अंतिम दिनांकअखेर म्हणजेच दि. 3 मे पर्यंत 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी 20 उमेदवारांकडून 29 नामनिर्देशनपत्रे सादर करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिली.
यात जीवा पांडु गावित (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट)) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, सुभाष रामु चौधरी (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट)) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, भास्कर मुरलीधर भगरे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) यांनी 4 नामनिर्देशनपत्रे, शिवाजी धर्मा बर्डे (भारत आदिवासी पार्टी) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, पल्लवी भास्कर भगरे, (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, बाबु सदु भगरे (अपक्ष) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, भारती प्रविण पवार (भारतीय जनता पार्टी) यांनी 4 नामनिर्देशनपत्रे, हरिश्चंद्र देवराम चव्हाण (अपक्ष) यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, भारत अरूण पवार (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, धोंडीराम किसन थैल ( बळीराजा पार्टी) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, संजय कांतीलाल चव्हाण (अपक्ष) यांनी 1 नामनिर्देशन पत्र, तुळशिराम चिमण खोटरे (बहुजन समाज पार्टी) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, अनिल गवळीराम बर्डे ( अपक्ष) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, मालती राहुल थविल (वंचित बहुजन आघाडी) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, गुलाब मोहन बर्डे (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, काशिनाथ सिताराम वटाणे (ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादूल मुसलमीन) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, अशोक मधुकर घुटे (अपक्ष) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, किशोर अंबादास डगळे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, खान गाजी इकबाल अह. (अपक्ष ) (ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादूल मुसलमीन) अशी 2 नामनिर्देशनपत्रे व दिपक गणपत जगताप (अपक्ष ) यांनी 1 नामनिर्देशनपत्र सादर केले. 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण 20 उमेदवारांनी एकूण 29 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.