गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये दोन चैनस्नॅचिंगच्या घटना…साडे चार लाखाचे अलंकार दुचाकीस्वारांनी केले लंपास

by India Darpan
मे 3, 2024 | 6:25 pm
in क्राईम डायरी
0
crime 118


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळया भागात बुधवारी (दि.१) दोन चैनस्नॅचिंगच्या घटना घडल्या. रस्त्याने पायी जाणा-या दोन महिलांच्या गळयातील सुमारे साडे चार लाख रूपये किमतीचे अलंकार दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. या घटना तपोवन आणि मखमलाबादरोड भागात घडल्या. याप्रकरणी आडगाव आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मखमलाबाद लिंकरोड भागात राहणा-या वर्षा चंद्रकांत जाधव (रा.हमालवाडी) या बुधवारी रात्री विवाह सोहळयानिमित्त तपोवन भागात गेल्या होत्या. रात्री आठ वाजेच्या सुमारास त्या स्वप्नपुर्ती लॉन्स समोरील रस्ता ओलांडत असतांना ही घटना घडली. या मार्गावर वर्दळीची वाहतूक असल्याने त्या अर्धा रस्ता क्रॉस करून दुभाजकांच्या मध्ये उभ्या असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व राणी हार असा सुमारे ३ लाख ६७ हजार ऐवज भामट्यांनी हिसकावून नेला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक दाईगंडे करीत आहेत.

दुसरी घटना मखमलाबाद रोडवरील श्रीमंगल ड्रायव्हींग स्कूल भागात घडली. याबाबत मंगला राजेंद्र विधाते (रा.तांबेमळा,मखमलाबाद ) यांनी फिर्याद दिली आहे. विधाते या बुधवारी सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. परिसरातील सुर्या रेसिडन्सी या इमारती समोरून त्या पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ८९ हजार रूपये किमतीची सोन्याची फॅन्सी पोत हिसकावून नेली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कल्याणमध्ये नवा ट्विस्ट …ठाकरे गटाकडून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

ठाण्यात उमेदवारी अर्ज भरायला जात असतांना दोन गुंडाच्या टोळ्यांमध्ये मिरवणुकीत मारामारी…आव्हाडांनी पोस्ट केला व्हिडिओ

India Darpan

Next Post
Untitled 1

ठाण्यात उमेदवारी अर्ज भरायला जात असतांना दोन गुंडाच्या टोळ्यांमध्ये मिरवणुकीत मारामारी…आव्हाडांनी पोस्ट केला व्हिडिओ

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011