इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कल्याण लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाकडून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. माजी महापौर रमेश जाधव यांनी हा अर्ज दाखल केला आहे. ठाकरे गट ६ तारखेला एबी फॅार्म बदलण्याची शक्यता आहे. हा ट्विस्ट अनेकांच्या भुवैय्या उंचावणारा आहे.
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून डॅा. श्रीकांत शिंदे यांची तर ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांची उमेदवारी घोषीत केली आहे. दोघांचा प्रचार जोरात सुरु असतांना आता ठाकरे गटाने मोठी राजकीय खेळी खेळली असल्याचे बोलले जात आहे.
कल्याण लोकसभामध्ये भाजप व शिवसेनेचा वाद नवा नाही. निवडणुका घोषीत झाल्यानंतर सुरुवातील कुरबुरी झाल्या. पण, हा वाद शमवण्यात भाजपला यश आले आहे. पण, आता ठाकरे गटाने नवा डाव टाकला असून तो ६ तारखेनंतरच स्पष्ट होणार आहे.