नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी सरकारवाडा व इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पहिली घटना पाथर्डी शिवारातील स्वराज्यनगर भागात घडली. विशाल बाळू सहाणे (रा. शुक्रतारा सोसा. स्वराज्यनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सहाणे यांची पल्सर एमएच १५ एफजी ०३७२ दुचाकी गेल्या २० एप्रिल रोजी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
दुसरी घटना घारपुरे घाट येथे घडली. योगेश सुर्यभान साळवे (रा.हनुमानवाडी) हे गेल्या २० एप्रिल रोजी सायंकाळी अशोकस्तंभ भागात गेले होते. घारपुरे घाट येथील सुजीवन अशोका ग्रुप शेजारी त्यांनी आपली दुचाकी एमएच १५ जीके ८६६८ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली.
तिसरी घटना सराफ बाजारात घडली. शेख रिझवान फकीर मोहम्मद (रा.भक्तीनगर,वडाळारोड) हे गेल्या २५ एप्रिल रोजी सराफ बाजारात गेले होते. गोपीका मार्केट भागात त्यांनी आपली स्प्लेंडर एमएच १५ बीसी १२२४ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. दोन्ही घटनांप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार खोडे व बागुल करीत आहेत.