रत्नागिरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उद्धव ठाकरे ६५ वर्षाचे झाले असून लवकरच ते निवृत्त होतील. त्यांच्यासाठी कणकवलीत वृद्धाश्रम बांधून ठेवला असल्याचा खोचक निशाणा नारायण राणे यांनी लगावला.
राणे म्हणाले, की ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते; मात्र ते काही करू शकले नाहीत. मी या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणले. अनेकांना रोजगार दिले. ठाकरे यांच्यासाठी मी कणकवलीत वृद्धाश्रम बांधून ठेवला आहे. लवकरच त्यांना त्या वृद्धाश्रमात पाठवणार आहेत. ठाकरे कोकणात सभा घेतात, तेव्हा तेव्हा आमचे मताधिक्य वाढते. आता ते आमच्या कोकणात सभा घेत आहेत. त्यामुळे आमचे मताधिक्य नक्की वाढेल.
दरम्यान, नितेश राणे म्हणाले, की राज ठाकरे हे नारायण राणे यांचे जवळचे मित्र आहेत. त्यांची कोकणाशी जवळीक आहे. राज यांच्या सभेमुळे आम्हाला ताकद मिळेल. उद्धव ठाकरे हा कपटी माणूस आहे. जो वडिलांचा झाला नाही तो शिवसैनिकांचा काय होणार, असा सवाल त्यांनी केला.