नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यामधील कळमदरी गावातील आदिवासी ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांसाठी लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. यावेळी ग्रामस्थांनी मेणबत्ती पेटवत कुठल्याही आमदार,खासदाराने मत मागण्यासाठी येऊ नये अशी शपथ ग्रामस्थांनी घेतली.
२०२३ पासून पिक विमा मिळालेला नाही, कळमदरी गावातील जिल्हा परिषद नवीन इमारत मिळालेली नाही, कळमदरी ते गिरणाडॅम रस्ता दुरुस्त झालेला नाही, चार महिन्यापासून आदिवासी बांधवांचे जातीचे दाखले व रेशनकार्ड अजूनही मिळाले नाही या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी बहिष्काराचे हत्यार उपसले आहे. कळमदरी हे दिंडोरी मतदारसंघात येत असून, यापूर्वी जामदरी येथिल आदिवासी नागरीकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.