इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कर्नाटक राज्यातील धारवाड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रल्हाद जोशी यांच्या प्रचारासाठी अलनावर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्थानिक मतदारांना संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवले आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी दहा तोंडाचे रावण एकत्र आले आहेत. आपली राम सेना तर त्यांची रावण सेना आहे. मोदीजींवर जितके जास्त आरोप झाले तेवढ्या निवडणुकीत विरोधकांच्या जागा कमी झाल्या. लोकशाही धोक्यात आली, संविधान बदलणार असा अपप्रचार केला जात आहे. मात्र जनता हुशार आहे ती विरोधकांचे डिपॉझिट जप्त करेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी धारवाड लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार प्रल्हाद जोशी तसेच भाजप आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कन्नडा लोकसभा मतदार संघात जाहीर सभा
कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील उत्तर कन्नडा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विश्वेश्वर कुमार हेगडे कागेरी यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला संबोधित करून नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विश्वेश्वर कुमार हेगडे कागेरी तसेच कर्नाटक भाजप आणि मित्रपक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपली राम सेना आहे, त्यांची रावण सेना आहे. अयोध्येत राम मंदीर उभारले आणि मोदीजी यांनी करोडो रामभक्तांचे स्वप्न पूर्ण केले. चोवीस तास काम करणारा देशभक्त मोदीजी आणि दुसरीकडे गरम वाटले की परदेशात जाणारे राहुल गांधी यातील फरक मतदारांनी ओळखायचा आहे असेही ते म्हणाले.