नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात आला. यापूर्वी विराट रॅली काढून महायुतीच्या वतीने शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे हेदेखील उपस्थित होते.
नाशिक लोकसभा मतदार संघाची महायुतीची उमेदवारी उशीरा जाहीर झाल्यानंतरही घटक पक्षांनी एकत्रीत येत ही महारॅली काढली. गोडसे यांचा अगोदरच प्रचाराचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अगोदरच इच्छुक उमेदवार म्हणून घरोघरी हॅण्डवीलही वाटले. त्यांचे स्टीकरही सर्वत्र लागले आहे. त्यामुळे त्यांनी प्रचारात अगोदरच आघाडी घेतलेली होती. त्यात महारॅलीची आता भर पडली आहे.
डॉ. भारती प्रविण पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज
दिंडोरी लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉ. भारती प्रविण पवार यांनी 20 दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या कक्षात नामनिर्देशन अर्ज सादर केला.यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ. राहुल आहेर, सुहास कांदे आदी उपस्थित होते.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1786007249309118860