नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– किरकोळ वादातून कोयत्याने हल्ला करीत टोळक्याने तरूणाची निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री गोदघाटावरील कपुरथळा भागात घडली. या घटनेनंतर पोलीसानी दोघांना गजाआड केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार मयुर राजेश पठाडे, रोहित उर्फ दादु सुधाकर पेखळे अशी संशयीताची नावे आहेत. मनपा कर्मचारी सनी जॉन मायकल हा त्याचे मित्र श्रेयस म्हस्के, सागर सोनवणे, अनिकेत सरोदे, रवि चव्हाण, अमोल चव्हाण यांचे सोबत बसलेला असतांना त्या ठिकाणी आरोपी योगेश साळी, दादु पेखळे, यश भागवत, मयुर पठाडे, गणेश शिरसाठ व इतर यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढुन दादु पेखळे व यश भागवत यांनी सनी जॉन यास शिवीगाळ, मारहाण करून, कोणत्यातरी धारदार हत्याराने त्याचे पोटावर पोटावर, उजव्या पायावर वार करून गंभीर दुखापत करून जिवे ठार मारून पळुन गेले. सदर संशयिता विरूध्द मयुर फ्रान्सीस जॉन यांचे तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर संवेदनशील गुन्हयाचे अनुषंगाने संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, किरणकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१, नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर यांनी सदर गुन्हयातील संशयित आरोपीताचा शोध घेवुन तात्काळ अटक करणेबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सदर घटनास्थळी भेट देवुन गुन्हयातील संशयित आरोपीतांचा शोध घेण्याकरीता पंचवटी पोलीस स्टेशन कडील पथके रवाना करण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुधकर कड यांना तांत्रिक व मानवी कौशल्याच्या आधारे संशयित आरोपी मयुर राजेश पठाडे, रोहित उर्फ दादु सुधाकर पेखळे हे कोणार्क नगर
परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचुन संशयित आरोपीतांस ताब्यात घेवुन पुढील तपासकामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.