नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासनमान्य देशी दारू विक्रेत्याला त्याचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी व त्यांचे बियर बार परमिट रूम वर कायदेशीर कार्यवाही न करण्याच्या मोबदल्यात ११ हजाराची लाच घेतांना राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे सहाय्यक दुय्यम निरीक्षक खलील खुर्शीद शेख हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. शेख यांच्याविरुध्द कोपरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईबाबत एसीबीने सांगितले की, तक्रारदार हे शासनमान्य देशी दारू विक्रेते असून त्यांचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी व त्यांचे बियर बार परमिट रूम वर कायदेशीर कार्यवाही न करण्याच्या मोबदल्यात खलील खुर्चीत शेख सहाय्यक दुय्यम निरीक्षक कोपरगाव यांनी पंचांसमक्ष ११००० रुपयांची मागणी करून ती पंचांसमक्ष घेताना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्या विरुद्ध कोपरगाव पोलीस स्टेशन, येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई*
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरूष वय- २५वर्ष
आलोसे- खलील खुर्शीद शेख, सहाय्यक दुय्यम निरीक्षक. नेमणुक- श्रीरामपूर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक. वय ४०वर्षे, रा. खडकी रोड, चर्चचे समोर ,कोपरगाव. ता. कोपरगाव जिल्हा- अहमदनगर
*लाचेची मागणी- ११०००/-
*लाच स्विकारली- ११०००/-
*हस्तगत रक्कम- ११०००/-
*लालेची मागणी – दि.०२/०५/२०२४
*लाच स्विकारली – दि.०२/०५/२०२४
तक्रार:- यातील तक्रारदार हे शासनमान्य देशी दारू विक्रेते असून त्यांचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी व त्यांचे बियर बार परमिट रूम वर कायदेशीर कार्यवाही न करण्याच्या मोबदल्यात आलोसे खलील खुर्चीत शेख सहाय्यक दुय्यम निरीक्षक कोपरगाव यांनी पंचांसमक्ष दि. ०२/०५/२०२४ रोजी ११००० रुपयांची मागणी करून आज रोजी ती पंचांसमक्ष ११०००/- रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले असून यातील आलोसे यांचे विरुद्ध कोपरगाव पोलीस स्टेशन, येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
- आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,अहमदनगर.
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
- *सापळा व तपास अधिकारी – श्रीमती गायत्री मधुकर जाधव, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक मोबा.नं. 75 88 51 60 42
- *सापळा पथक – पोलीस हवालदार संदीप वणवे, पोलीस हवालदार ज्योती शार्दुल.