इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली. या आरोपीला गंभीर अवस्थेत तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला.
सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अनुज थापन व सोनू चंदर या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली. अनुज याने तुरुंगात चादरीने गळफास घेतला. ही बाब तुरुंगातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला जीटी रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले; पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अनुज याच्यावर हल्लेखोरांना शस्त्र उपलब्ध करून देण्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याच्या पंजाब येथून मुसक्या आवळल्या होत्या.