इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये जो उमेदवार देतील त्याला ५१ टक्के मते कसे मिळतील, उमेदवार निवडून आणू, यासाठी भाजप, राष्ट्रवादी काम करेल अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना दिली.
यावेळी ते म्हणाले की, पक्ष म्हणून आम्हाला महायुतीत काम करायचंय, शिवसेना उमेदवाराचा निर्णय शिंदेंनी घ्यायचा आहे. नाशिकची सीट जात नाही, १८ दिवस बाकी आहेत. महायुतीचे इथे मोठं जाळे आहे. भाजपचे ३, राष्ट्रवादीचे २ आणि काँग्रेसचे १ आमदार आहे. ही जनतेची निवडणूक, जनतेला मोदींना मतं द्यायची आहेत. महायुतीने कुणीही उमेदवार दिला तरी लोक मोदींना मतं देतील असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी पालघरची जागा भाजपची, भाजप त्या ठिकाणी उमेदवार देईल असेही ते म्हणाले. यावेळी ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिंडोरी सभेला येतायत. मोदी येत असल्यानं भुजबळांना याची संपूर्ण माहिती देण्यासाठी आलो आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रचार व्यवस्थेत भुजबळांचं महत्वाचं स्थान आहे. विदर्भात भुजबळांनी प्रचार केला. येथे उत्तर महाराष्ट्रात देखील त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. मोदींच्या सभेला आणि महायुतीचे सीट जिंकण्यासाठी भुजबळांची मोठी मदत होईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळई त्यांनी नाशिकच्या जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय करतील. भाजपने आणि राष्ट्रवादीने दावा सोडलाय
सीटिंग जागा नाशिकची त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी निर्णय करायचा आहे.