इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पाटणाः सासूचे जावयावर जडले प्रेम जडल्यानंतर सासऱ्याने लग्न लावून दिल्याची घटना बिहारमध्ये घडली. सध्या या अनोखी प्रेमकहाणीची सर्वत्र चर्चा आहे. दोघांनीही समाजाचे नियम बाजूला ठेवून लग्नाची गाठ बांधली आहे. सासूच्या इच्छेनुसार जावयाने सर्वांसमोर लग्न केले.
बिहारमधील बांका येथे ही घटना घडली.
जावयाने सासूसोबत कोर्ट मॅरेज केले. विशेष म्हणजे जावयाची सासू ही तिसरी पत्नी बनली. दिलेश्वर दरवे यांची पत्नी गीता देवी आणि जावई सिकंदर यादव यांनी लग्न केले आहे. दिलेश्वर दरवे यांनी सुमारे अडीच दशकांपूर्वी धोबनी येथील सिकंदर यादव यांच्याशी आपल्या मुलीचे लग्न केले. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांची पहिली पत्नी मरण पावली. दुसरे लग्न झाल्यावर सिकंदरच्या आयुष्यात चांगले दिवस आले; पण त्याचे हे दुसरे लग्न अयशस्वी ठरले.
सिकंदरने त्याच्या दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिला. इतके सगळे असूनही तो त्याच्या पहिल्या पत्नीच्या घरी येत राहिला. त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले होती. दुसऱ्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर सिकंदरचे आयुष्य एकाकी झाले होते. तो सासू गीता देवी यांच्याशी सतत फोनवर बोलत राहिला. या संवादाचे रुपांतर प्रेमात झाले. या दोघांच्या प्रेम संबंधाची कुणकुण दिलेश्वर दरवे यांना संशय आला. जावई आणि सासूमधील प्रेमसंबंध वाढले. दिलेश्वर यांना ही बाब कळल्यावर त्यांनी या दोघांच्या प्रेमासाठी पुढाकार घेतला. सासू-जावयाची प्रेमकहाणी त्यांनी समाजातील लोकांना सांगितली आणि पटवून दिली. जावई आणि सासूने प्रेमाची सर्वांसमोर कबुली दिली. सासरच्या मंडळींनीही त्यांच्या नात्याला होकार दिला.