मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडीची अखेरची जागा आज काँग्रेसने जाहीर केली. मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातून भाजपचे पीयूष गोयल यांच्या विरुध्द भूषण पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
या जागेवर काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे घोसाळकर यांच्यासाठी प्रयत्न सुरु होते. पण, घोसाळकर यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर या जागेवर भूषण पाटील यांची वर्णी लागली आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेस या तिन्ही पक्षाने आपआपले उमेदवार जाहीर केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे ४८ उमेदवार आता निश्चित झाले आहे.
महायुतीचे अद्यापही ४ उमेदवारांच्या नावाची घोषणा बाकी आहे. त्यामुळे उद्या त्यांची नावे समोर येतील. त्यानंतर संपूर्ण राज्याच्या लढतीचे चित्र स्पष्ट होईल.