नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी १ मे रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येला भेट देणार आहेत. अयोध्येतील मुक्कामादरम्यान राष्ट्रपती हनुमान गढी मंदिर, प्रभू श्रीराम मंदिर तसेच कुबेर टीला या पवित्र स्थळांवर दर्शन तसेच आरती करतील. तसेच त्या शरयू नदीचे पूजन आणि आरती देखील करतील.









