नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– दिंडोरीरोडवरील वज्रेश्वरी नगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ८७ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात सोन्याची पोत व रोकडचा समावेश आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उषा शांतीलाल फुलमाळी (रा.म्हसोबा महाराज मंदिराजवळ) यानी फिर्याद दिली आहे. फुलमाळी कुटूंबिय रविवारी (दि.२८) कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली सोन्याची पोत व रोकड असा सुमारे ८७ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार माळवाळ करीत आहेत.