इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीमध्ये चार जागांचा तिढा सुटला असून नाशिक व ठाणे येथे मात्र अद्याप निर्णय झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीमध्ये कल्याण य़ेथे डॅा. श्रीकांत शिंदे, पालघर येथे राजेंद्र गावित, दक्षिण मुंबईत यामिनी जाधव, मुंबई उत्तर पश्चिम रवींद्र वायकर हे उमेदवार असणार आहे.
श्रींकात शिंदे यांचे नाव अद्यापपर्यंत अधिकृत जाहीर झालेली नाही. पण, शिंदे यांचे देवेंद्र फडणवीस यांनी नाव जाहीर केले आहे.तर पालघरमध्ये गावित भाजपचे की शिवसेनेचे एवढेच ठरायचं बाकी आहे. मुंबई उत्तर पश्चिम रवींद्र वायकर यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाली आहे. तर यामिनी जाधव यांची दक्षिण मुंबईतून उमेदवारी जाहीर झली आहे, नाशिक व ठाणे येथे मात्र उमेदवार निश्चित नाही.
ठाणे येथे नरेश म्हस्के यांचे नाव निश्चित होते. पण, त्यांना भाजपने विरोध केला. तर नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांचे नाव जवळपास निश्चित असतांना शांतीगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज शिवसेनेकडून भरल्यामुळे या जागेवर सस्पेन्स वाढला आहे. आज किंवा उद्या या दोन्ही जागेवर उमेदवारी घोषीत होईल असे बोलले जात आहे. दरम्यान आज नाशिकमध्ये भाजपच्या हालचाली वाढल्या असून तडकाफडकी गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झाले. तर मंत्री भारती पवार यांनी भुजबळांची भेट घेतली.