नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या शासकीय कामकाजाच्या तिसऱ्या दिवशी मंगळवार ३० एप्रिल रोजी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी निरंक तर नाशिक मतदार संघासाठी ३ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली.
दिंडोरी लोकसभा मतदार संघातून आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या दालनात लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरी मतदारसंघातून एकही नामनिर्देशनपत्र सादर केले गेले नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिली.
तर २१ नाशिक लोकसभा मतदार संघातून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या दालनात कमलाकर बाळासाहेब गायकवाड (दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल), सिद्धेश्वरानंद गुरू स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती (अपक्ष) व जितेंद्र नरेश भावे (अपक्ष) अशी एकूण ३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी ही माहिती दिली.