इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
टी २० विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या १५ खेळाडूंची आज बीसीसीआयने घोषणा केली आहे. वर्ड कपच्या या संघात रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली संघात हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ऋषभ पंत आणि संजू सॅमसन विकेटकीपर असतील. केएल राहुल याचा पत्ता कट करण्यात आला आहे. वेगवागन गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, सिराज आणि अर्शदीप सिंह यांना स्थान देण्यात आले आहे. १ जून पासून टी २० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने ही घोषणा केली आहे.
टी20 विश्वचषकासाठी अशा आहे भारतीय संघ असा असणार आहे. रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, राखीव खेळाडू – शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान