मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सांगली लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. याअगोदर वंचितने ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर वंचितने आपला निर्णय बदलले आहे. या पाठींब्यामुळे विशाल पाटील यांचे बळ वाढले आहे.
या निवडणुकीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील, ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील व विशाल पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे वंचितने हा निर्णय़ घेतला असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या निवडणुकीत विशाल पाटील यांना ३ लाख ४४ हजार मते मिळाली होती. तर वंचितच्या गोपीचंद पडळकरांनी ३ लाख मते घेतली होती. त्यामुळे वंचितचा या निवडणुकीत पाटील यांना फायदा होणार आहे.