इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एकीकडे ड्रग्ज माफिया विरुध्द नाशिकला शिवसेनेचा मोर्चा निघाला असतांना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेवरच हल्लाबोल करत मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, ललित पाटील याला अटक झाली १० नोव्हेंबर २०२० ला.. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्याला नाशिक शिवसेनेचे प्रमुख केले होते. अटक झाल्यावर पोलिसांनी पोलिस कोठडी मागितली. ती १४ दिवस मिळाली. त्यांनी लगेच ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कोर्टात आम्ही चौकशी केली नाही, असा अर्ज सुद्धा केला नाही. किंवा पुन्हा कोठडी सुद्धा मागितली नाही. गुन्हेगाराची साधी चौकशी सुद्धा झाली नाही. कोणी दबाव आणला? मुख्यमंत्री की गृहमंत्री? आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. पण आज सांगणार नाही असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा गौप्यस्फोट केला.
यावेळी त्यांनी ही पहिली प्रेस आहे. आणखी प्रेस घेणार असल्याचेही सांगितले. गेल्या काही दिवसापासून ड्रग्ज प्रकरणात सत्ताधारी पक्षावर थेट आरोप केले जात असतांना त्याला देवेंद्र फडणवीस यांनी पहिले उत्तर दिले. या पत्रकार परिषदेत त्यांनी कंत्राटी भरतीवरुन विरोधकांना घेरले. त्यानंतर हा जीआर रद्द केल्याचे सांगितले.
फडणवीस यांनी केलेल्या या आरोपानंतर आता ठाकरे गटाकडून त्यावर कसे उत्तर दिले जाते हे महत्त्वाचे आहे. एकुणच ड्रग्ज प्रकरणात रोज वेगवेगळे खुलासे होत असतांना राजकीय पटलावरही आरोप – प्रत्यारोप सुरु आहे.