इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चांदवड येथे सकाळी राहुड घाटात बस व ट्रकमध्ये झालेल्या अपघानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी जखमी रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी बसमध्ये जवळपास ५० प्रवाशी होते व ते सर्वच जखमी असून त्यातील काही गंभीर आहेत. या अपघातत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे..
सर्व पोलीस यंत्रणांनी येऊन मदत व पाहणी केली. जखमींना हायर सेंटरची आवश्यकता असल्यास नाशिकला पाठवू असेही त्यांनी सांगितले. या अपघात दुर्लक्षामुळे झाला असून ही दुर्दैवी घटना आहे. बस जुनी नवी अशी काही गोष्ट नाही पण, चौकशी अंती चुक कोणाची हे कळेल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी १० लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली. परिवहन विभागाच्या नियमानुसार परिस्थिती बघून मदत केली जाईल. सर्व पद्धतीने काळजी आम्ही घेतो आहे असेही त्यांनी सांगितले.