नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवून अहमदनगर येथील एकाने शहरात वास्तव्यास असलेल्या तरूणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. गेली सहा सात वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रेमप्रकरणात संशयिताने लग्नास नकार दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण रमाकांत मडकर (३५ रा.वाडिया पार्क,टिळकरोड अहमदनगर) असे संशयिताचे नाव आहे. शहरातील कोनार्क नगर भागात राहणा-या पीडितेने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. संशयित आणि पीडिता यांच्यात २०१७ पासून प्रेमप्रकरण असून संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर वेळोवेळी बलात्कार केला.
सहा सात वर्ष उलटूनही संशयित लग्नाबाबत पुढाकार घेत नसल्याने युवतीने त्याच्याकडे तगादा लावला असता ही घटना घडली. संशयिताने शिवीगाळ करीत तरूणीस लग्नास नकार दिल्याने तिने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निखील बोंडे करीत आहेत.
…..