नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी शांतीगिरीजी मौनगिरीजी महाराज यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आज सिद्धेश्वरानंद गुरू स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या कडे नामनिर्देशनपत्र दाखल केले.
सकाळी कमलाकर बाळासाहेब गायकवाड (दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल) यांनी अर्ज दाखल केला. सोमवारी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी १ व नाशिक मतदार संघासाठी ६ असे एकूण ७ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. आज किती अर्ज दाखल होतात हे दुपारी ३ नंतर स्पष्ट होईल.
दिंडोरीत काल १ नामनिर्देशन पत्र दाखल
दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या दालनात भास्कर मुरलीधर भगरे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरी मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र सादर केले. निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी ही माहिती दिली.
नाशिकमध्ये यांनी अर्ज दाखल केले
तर नाशिक लोकसभा मतदार संघातून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या दालनात पराग प्रकाश वाजे (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)) यांनी २ नामनिर्देशन पत्रे, जयश्री महेंद्र पाटील (सैनिक समाज पार्टी), शांतीगिरीजी मौनगिरीजी महाराज (शिवसेना), देवीदास पिराजी सरकटे (अपक्ष) व (वंचित बहुजन आघाडी) यांनी २ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी ही माहिती दिली.