इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतातील आघाडीचा दागिन्यांचा ब्रँड रिलायन्स ज्वेल्स’ने यावर्षी अक्षय तृतीयेनिमित्त विंध्य कलेक्शन सादर करून अद्वितीय आणि उत्कृष्ट संग्रहांसह सण साजरा करण्याची आपली परंपरा कायम ठेवली. ‘ज्वेल्स ऑफ इंडिया’ संग्रह मालिकेतील नवव्या क्रमांकाचे विंध्य हे मध्य प्रदेशातील समृद्ध कलात्मक परंपरांनी प्रेरित आहे. फॅशन आयकॉन आणि बॉलिवूड दिवा दिशा पटानी हिने वाराणसी येथील रिलायन्स ज्वेल्सच्या स्टोअरमध्ये एका विशेष कार्यक्रमात खास सणाच्या कलेक्शनचे अनावरण केले.
अक्षय तृतीया हा हिंदू संस्कृतीतील समृद्धी आणि विपुलतेचे प्रतीक असलेला शुभ सण, दाग-दागिने खरेदीचा योग्य प्रसंग मानला जातो. हा प्रसंग साजरा करताना, रिलायन्स ज्वेल्स’तर्फे विंध्य कलेक्शनमध्ये मध्य प्रदेशच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला आणि स्थापत्यकलेच्या वैभवाला समर्पित दागिन्यांची एक आश्चर्यकारक मांडणी आहे. ग्वाल्हेर किल्ला, सांची स्तूप, उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर आणि मितौली आणि बटेश्वर मंदिरे यासारख्या मध्य प्रदेशातील प्रसिद्ध स्मारकांपासून प्रेरित आराखड्यांसह अलंकाराचा प्रत्येक तुकडा अतिशय बारकाईने तयार करण्यात आला आहे.
रिलायन्स ज्वेल्स’चे सीईओ सुनील नायक म्हणाले, “या अक्षय तृतीयेनिमित्ताने विंध्य कलेक्शन’चा शुभारंभ हा भारताचा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा साजरा करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. मध्य प्रदेशच्या समृद्ध परंपरांनी प्रेरित, हा संग्रह आमच्या ‘ज्वेल्स ऑफ इंडिया’ मालिकेतील नववा असून भारतीय कला तसेच हस्तकलेला समर्पित पावती म्हणून उभा आहे.”
अभिनेत्री दिशा पटानी हिने रिलायन्स ज्वेल्सच्या वाराणसी स्टोअरमध्ये या कलेक्शनचे अनावरण करताना आपला उत्साह व्यक्त करताना सांगितले की, “या कलेक्शनमधील प्रत्येक तुकडा हा मध्य प्रदेशचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि स्थापत्यकलेचे वैभव प्रतिबिंबित करणारा उत्कृष्ट नमुना आहे. मला वैयक्तिकरित्या, हिऱ्याच्या हारांची रचना आवडते, जी उज्जैनमधील विविध मंदिरांमधील घटकांचे सुंदर मिश्रण करते. हे केवळ दागिने नाहीत; ती परंपरा आणि सौंदर्याची अस्सल प्रतीकं आहेत. जी प्रत्येकाच्या वॉर्डरॉबमध्ये असणे आवश्यक आहे”.
अचूकतेचा उत्तम नमुना असलेले विंध्य कलेक्शन वैविध्यपूर्ण दागिन्यांची श्रेणी देऊ करते, त्यात व्यवस्थित घडवलेले चोकरपासून बारकाईने डिझाईन करण्यात आलेल्या बांगड्यांचा समावेश आहे. हे दागिने सोने-चांदीत उपलब्ध आहेत. विंध्य कलेक्शन केवळ दागिने नसून हा परंपरा, नजाकत आणि कालातीत सौंदर्याचा जल्लोष आहे. सणासुदीच्या प्रसंगी पारंपरिक साडीवर किंवा समकालीन पोशाखात तसेच तुमच्या दैनंदिन पोशाखात ग्लॅमरचा स्पर्श व्हावा म्हणून परिपूर्ण, दगिन्यांचा प्रत्येक तुकडा अभिजात आणि सुसंस्कृतपणा दर्शवितो, ज्यामुळे तो अक्षय तृतीया शैलीत साजरा करण्यासाठी आदर्श बनतो.