इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्रात कंत्राटी भरतीचा गदारोळ केला जातो आहे. जे दोषी आहेत, तेच गदारोळ करीत आहेत. त्यांची थोबाडं उघडं करण्यासाठी आज पत्रपरिषद घेतली असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या पापाचे ओझे आपण का उचलायचे? म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून आम्ही हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंत्राटी भरतीचे संपूर्ण पाप, हे ऊबाठा, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. आंदोलन करताना यांना लाज वाटली पाहिजे. हे १०० टक्के त्यांचे पाप आहे. त्यांनी माफी मागावी, त्यांनी माफी मागितली नाही, तर त्यांना जनतेत उघडे करावे लागेल असेही ते म्हणाले. यावेळी ते म्हणाले मुंबईतील पोलिस भरती बाबत असाच एक भ्रम पसरविला जातो आहे. मुंबई पोलिस दलात कंत्राटी भरती नाही. नियमित पोलिस भरती सुरु आहे. यात १८,३३१, यात मुंबईतील ७०७६ पोलिस शिपाई आणि ९९४ वाहनचालक आहे. परंतू नियमित पोलिस भरतीत नियुक्ती पत्रे दिल्यावर वर्षभराचे प्रशिक्षण यात वेळ जातो. तोवर पोलिस दल रिकामे ठेवता येत नाही.
त्यामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, जे शासनाचेच आहे आणि त्यांच्या सेवाही नियमित वापरल्या जातात, त्यांच्याकडून नियमित पोलिस रुजू होईस्तोवर ३००० पोलिस वापरण्याचे ठरविले आहे. राज्यातील तरुणांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न. राज्य सरकार युवकांच्या पाठीशी उभे असल्याचेही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बघा संपूर्ण पत्रकार परिषद…