इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तराखंड सरकारने बाबा रामदेव यांच्या पतंजली दिव्य फार्मसी कंपनीच्या १४ औषधांवर बंदी घातली आहे. या कारवाईमुळे पतंजलीला मोठा झटका बसला आहे. उत्तराखंडच्या औषध नियंत्रण विभागाने ही कारवाई केली आहे. पतंजलीने दिशाभूल करणा-या जाहिरातील केल्याने या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर उत्तराखंड सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे.
पतंजली दिव्य फार्मसीच्या १४ औषधांवर बंदी घालण्यात आली असून त्यामध्ये श्वासारि गोल्ड, श्वासारि वटी, दिव्य ब्रोकोम, श्वासारी प्रवाही, श्वासारि अवलेह, मुक्ता वटी एक्स्ट्रा पावर, लिपिडोम, बीपी ग्रिट, मुधग्रिट, मधुनाशिनी वटी, एक्स्ट्रा पावर, लिवामृत एडव्हान्स, लिवोग्रिट, आईग्रिट गोल्ड आणि पतंजली दृष्टी आय ड्रॅाप या औषधांचा समावेश आहे.